भय इथले संपत नाही,…..

23 01 2008
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीतेते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायातो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

गीत - ग्रेस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

अंमलबजावणी

Information

१ प्रतिसाद

23 02 2009
अरुण

ह्या गाण्याचे बोल बरेच दिवस हवे होते, अवचित मिळाल्याचा आनंद झाला. गाणं खुपचं अर्थपुर्ण आहे, आणि गोडही.

यावर आपले मत नोंदवा