अ आ इ ई ………
माझी पहिली अक्षर ओळख झाली ती अशी.
माणसाच्या इतिहासात अगिच्या शोधाचं जे महत्व आहे, तेच महत्त्व बाराखडीला माझ्या इतिहासात आहे. जगातल्या ज्ञानाचे पाहिले काही थेंब जे या धोंड्यावर पडलेत ते याच बोलीत.
काही लिहाव, तेसुद्धा मराठीत, ही स्फुर्ती तशी जु्नीच. पण मातृभाषेत विचार करणं, प्रतिक्रिया करणं वेगळं आणी ते विचार सुसंगतपणे लिखित स्वरुपात मांडणं वेगळं. (त्यात माझा आणी व्याकरणचा ३६ चा आकडा!)
माणसाला सुचलेलं दुसरं एक शहाणपण म्हणजे चाक. मराठी जर माझी आग असेल तर माझं चाक आहे इंग्रजी! जग्गजेत्यांची, तंत्रज्ञानाची भाषा. बाराखडीच्या वाटेनी सुरुवात झाली आणी वाघिणीचं दुध पिऊन जगाच्या स्पर्धेत उतरलो. मराठी माझी मातृभाषा, जन्मदाति. आणि सांभाळ करुन नावारुपाला आणलयं इंग्रजी भाषेनी. त्यामुळे लिहितांना कुठे इंग्रजीचं infiltration झाल तर please dont mind करा बर का!